जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा
जिज्ञासाच्या “हेरिटेज वॉक” उपक्रमाची दशकपुर्ती
सातारा
आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळाबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून जागतिक वारसा दिन जगभरात साजरा केला जातो.याच दिवसाचे औचित्य साधून सातारास्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था साताऱ्यातील ऐतिहासिक ठिकाणी “हरीटेज वॉक ” चे आयोजन करित असते .यंदा या हेरीटेज वॉकचे दहावे वर्ष होते .या उपक्रमाची दशकपूर्ती निमित्ताने यावर्षी देखील जिज्ञासा संस्था छ्त्रपती शिवाजी महावि्द्यालय व महाराणी येसूबाई फाउंडेशन व यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते .
सातारची संगम माहूली म्हणजे अत्यंत कलात्मकतेने उभारलेल्या मंदिरांची मांदियाळी आहे. त्याचबरोबर राजधानी साताऱ्याचे निर्माते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ,यांच्या मातोश्री येसूबाई साहेब, पत्नी सगुणाबाई , महाराणी ताराबाई यांसारख्या ऐतिहासिक महत्त्व असलेली व्यक्ती्ची समाधी स्थळे या ठिकाणी आहेत .जिज्ञासा संस्था व महाराणी येसुबाई फ़ाऊडेशन याच्या संयुक्त संशोधनातून नुकतेच महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्थळाची स्थान निश्चिती झाली आहे .तसेच शासन दरबारी सदर स्मारकाचे राज्य सुरक्षित यादीत समावेश व्हावा यासाठी देखील दोन्ही संस्थांनी पाठपुरावा केला . संस्थांच्या या प्रयत्नांना यश येऊन शासनाने सदर स्मारक हे राज्य सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून लवकरच या स्मारकाचे संवर्धनाचे कामास सुरुवात होणार आहे. त्या निमित्ताने हा उपक्रम महत्वाचा होता .येसुबाई फाऊडेशनचे सुहास राजेशिर्के यांच्यासह जिज्ञासाचे निलेश पंडित ,योगेश चौकवाले ,संदिप वाघुलकर यांनी या ठिकाणच्या स्थळाची माहिती दिली .
माहूली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने यांनी आभार मानले सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख. इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. धनाजी मासाळ, डॉ. रामचंद्र कुंभार, डॉ. सुभाष कारंडे, डॉ. अभिजीत पोरे, डॉ. विकास येलमार, डॉ. दत्तात्रय कोरडे, प्रा. महादेव चींदे, प्रा. शरद ठोकळे, प्रा. कबीरदास वाघमारे, डॉ. सीमा कदम, .कन्याशाळेच्या सुजाता गेंगजे , तसेच फाऊंडेशनचे लीलाधर राजे भोसले.दिलीपराव गायकवाड यानी आपल्या विद्यार्थांसह सहभाग नोंदवला
