हतबल झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतो


मुकुंद फडके यांच्या सत्कार सोहळ्यात प्रा डॉ यशवंत पाटणे यांचे प्रतिपादन
सातारा
पत्रकार हा लोकशिक्षक असतो आणि समाजाला दिशा देण्याचे काम करतो. हतबल झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करू शकतो. ज्येष्ठ पत्रकार संपादक मुकुंद फडके मुकुंद फडके यांच्या लेखनातून उद्याचा सजग नागरिक घडेल, असा मला विश्वास वाटतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले
प्राचार्य डॉ. पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांच्या वतीने पत्रकार, लेखक, संपादक, प्राध्यापक, वक्ते, चित्रपट अभ्यासक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी मुकुंद फडके यांच्या षष्ठीपूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ संपन्न झाला.तेव्हा ते बोलत होते या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक व पर्यावरण अभ्यासक डॉ. संदीप श्रोत्री, दैनिक प्रभात सातारा आवृत्तीचे संपादक श्रीकांत कात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, तसेच दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले हे उपस्थित होते.

Advertisement

प्राचार्य डॉ. पाटणे म्हणाले,मुकुंद फडके यांचे आयुष्य हेच सुंदर गीत आहे त्यामध्ये ताल,सूर आहे. फडके यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले तेच संस्कार त्यांनी आपल्या कारकिर्दीत वापरले अनेक लेखकांना घडवण्याचे काम त्यांनी केले गुणवत्ता निर्माण करण्याची गुणग्राहकता त्यांच्याकडे आहे फडके यांचे शब्द हे प्रेरणादायी असून त्यातून ऊर्जा मिळते. त्यांच्या लेखणीत उद्याचा सजग नागरिक निर्माण करण्याचे बळ आहे
विनोद कुलकर्णी म्हणाले, “फडके यांच्यासारख्या निस्वार्थी व्यक्तींचा सन्मान करण्याचे कार्य शिरीष चिटणीस यांनी हाती घेतले आहे. सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे काम फडके करत असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग भविष्यात नक्कीच होईल.”
श्रीकांत कात्रे म्हणाले, “पत्रकारितेच्या प्रवासात आम्ही समवयस्क आहोत. व्यावहारीक दृष्ट्या मुकुंद फडके निवृत्त झाले असले तरी आजही त्यांच्या लेखन, वाचन, बोलण्याची उर्जा तितकीच आहे.”
डॉ. संदीप श्रोत्री यांनी सांगितले की, “फडके यांनी घेतलेले काम ते वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करतात. लवकरच पुस्तकप्रेमी समूहातर्फे त्यांच्या साहित्यावर आधारित मुलाखत घेण्यात येणार आहे.”
शिरीष चिटणीस यांनी दीपलक्ष्मी सांस्कृतिक उपक्रमांत फडके यांच्या योगदानाचा गौरव केला. “ते प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन देतात. फडके याना घडवण्यात त्यांच्या पालकांचा मोठा वाटा आहे,” असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना मुकुंद फडके म्हणाले, “आई वडिलांनी दिलेले संस्कार पुढे नेण्याचे काम मी केले आयुष्यात अनेक चढउतार पहिले अनेक संधी गमावल्या पण समोर जे आले आहे ते आनंदाने जगत गेलो अनेक माणसे संपर्कात आली त्याची नेहमी बेरीज होत गेली वजाबाकी झाली नाही ठरवून निर्णय घेऊन आनंदाने जगत असल्याने कोणतीच तक्रार नाही या सत्कार सोहळ्याबद्दल शिरीष चिटणीस यांचा मनापासून आभारी आहे

मुकुंद फडके यांच्या पत्नी सौ. मंजिरी फडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात श्याम बडवे, पद्माकर पाठकजी , श्रीकांत देवधर, डॉ. लियाकत शेख, सुरेश साधले, डॉ. सुहास पाटील, प्राचार्य नलवडे, रवींद्र खांडेकर,उज्वला करंबेळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले. आभार प्रदर्शन विनायक भोसले यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!