अभियंता तरुणीवर अत्याचार


बळजबरीनं धर्मांतर; छत्रपती संभाजीनगरातील घटना

Advertisement

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर शहरात एका अभियंता तरुणीवर अत्याचार करून बळजबरीने तिचे धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी संबंधित तरुणीने केलेल्या आरोपांनंतर तीन जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहेर तय्यब पठाण, तय्यब शब्बीर पठाण, आणि आयेशा बाहेर पठाण अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत.
तरुणीकडून करण्यात आलेल्या आरोपानुसार ताहेर पठाण हा बांधकाम व्यवसायिक असून त्याने स्वतःचे नाव लपवून आणि अविवाहित असल्याचे सांगून अभियंता तरुणीवर अत्याचार केला आणि 11 फेब्रुवारी रोजी बळजबरीने तिचे धर्मांतर केले. तीला धर्मगुरूकडे नेऊन कपडे आणि केस जमा करण्यास लावून बळजबरीने प्रार्थना करण्यासही भाग पाडले आणि कोऱ्या बॉण्डवर खोट्या सह्या घेऊन लग्नही लावले.मात्र यानंतर या तीन आरोपींनी या तरुणीला मारहाण करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शहरातील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचेही धर्मांतर केल्याचा प्रकार सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!