प्रशिक्षण ऍकॅडमीचे विमान कोसळले,


कराड विमानतळावर घटना ,प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी

Advertisement

कराड
कराड विमानतळावर प्रशिक्षण ऍकॅडमीचे फोरसीटर विमान कोसळले. यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. सोलो ट्रेनिंग सुरू असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पॉवर वाढल्याने वैमानिकाला विमान कंट्रोल झाले नाही.त्यामुळे विमान कोसळले. सुदैवाने विमानाने पेट घेतला नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कराड येथील विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या ऍम्बिसिअन्स फ्लाइंग क्लबने आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. 20 प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच येथे प्रशिक्षण घेत आहे. सध्या सोलो ट्रेनिंग सुरू आहे. प्रशिक्षण सुरू असताना फोरसीटर विमानाची पॉवर वाढली आणि विमान हवेत उडाले. त्यानंतर धावपट्टीवर संरक्षक भिंतीजवळ पलटी झाले.विमानतळाच्या दक्षिणेकडील संरक्षक भिंत ही वारुंजी गावालगत आहे. अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात होते. थोडय़ाच वेळाने विमान भिंतीच्या आतील बाजूला कोसळले. या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!