राज कुंद्रांची 97 कोटींची मालमत्ता जप्त
अमलबजावणी संचालनालयाने केली कारवाई
मुंबई
अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत व्यापारी राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेत राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या जुहू येथील फ्लॅटचाही समावेश आहे.
याशिवाय राज चंद्रा यांच्या नावे पुण्यात असलेला फ्लॅट आणि इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि ॲपद्वारे त्यांचा प्रसार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. नंतर राज कुंद्रा यांना या प्रकरणात जामीन मिळाला होता
