वार्षिक राशिभविष्य 2024 वृश्चिक रास


वृश्चिक रास

 

Advertisement

करिअरमध्ये चांगली प्रगती होईल
न्यूज मंडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वृश्चिक राशीचे लोक खूप जास्त आकर्षित असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप दिलखुलास असते. त्यांच्या कामात ते खुप जास्त हूशार असतात. ते कोणतेही काम मन लावून करतात त्यामुळे त्यांना आयुष्यात भरपूर यश मिळते.या लोकांना जे क्षेत्र आवडते, त्याच क्षेत्रात ते करिअर बनवतात. त्यांना आयुष्य त्यांच्या आवडीने जगायला आवडते. ते आयुष्यात त्यांच्या नीतींना खूप जास्त महत्त्व देतात.हे लोक खूप विश्वासू आणि प्रामाणिक असतात. ते एक चांगले मित्र असतात आणि संकटाच्या वेळी मित्रांना मदत करतात. ते एक चांगले जोडीदारही असतात. ते त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात.हे लोक कुटूंबाला सर्वस्व मानतात. कुटूंबाला ते प्रथम प्राधान्य देतात. ते खूप चांगले पालकही असतात. मुलांच्या आनंदासाठी ते वाट्टेल ते करतात.
वर्षाच्या सुरुवातीलाच चतुर्थस्थानात होणारी शनी मंगळ युती ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रासदायक ठरू शकते राजकारणी व्यक्तींनी बोलताना विचारपूर्वक बोलावे मे महिन्यानंतर येणारे वर्ष प्रगतीदायक ठरेल काही नोकरदारांना बढतीचे संकेत मिळतील व्यावसायिकांनाही उत्तम लाभ मिळेल मात्र ग्रहणाजवळ आपली प्रतिष्ठा जपा अनेक तरुणांचे विवाह योग येतील कलाकारांना अपेक्षित काम मिळेल अनेकांना वास्तू योगाचेही लाभ होतील एकूणच काही पथ्य पाळली तर येणारे वर्ष हे तरुणांसाठी प्रगतिशील राहील
एप्रिल 2024 पर्यंत गुरुचे षष्ठ स्थानातील भ्रमण करियर आणि धनलाभ साठी फारसे अनुकूल नाही शनि चतुर्थस्थानात भ्रमण करेल एप्रिल 2024 नंतर गुरु तुमच्या सप्तमस्थानातून भ्रमण करेल ज्यामुळे चांगले धनलाभ होतील व्यापाऱ्यांसाठी हे भ्रमण लाभदायक ठरेल या काळात नवीन मित्रही मिळतील या काळात तुम्ही आध्यात्मिक कार्य जास्त कराल विवाह योग्य जातकांचा विवाह संपन्न होईल
चतुर्थातील शनी मुळे कामाचा ताण वाढेल काहींची नोकरीत बदली होऊ शकते काहीजणांना चांगली संधी मिळेल म्हणून नोकरीत बदल करू शकतात राहू आणि केतू पंचम आणि लाभ स्थानात भ्रमण करतील गुरुची दृष्टी केतूवर असल्यामुळे करिअरमध्ये चांगली प्रगती होईल मे 2024 नंतर नवीन नोकरीच्या संधी मिळतील व्यापाऱ्यांना मे 2024 नंतरचा काळ अनुकूल राहील पंचमस्थानातील राहू मुळे परदेशात जाण्याचे योग येतील जे लोक व्यवसाय करतात त्यांना एप्रिल 2024 पर्यंत सावध राहावे लागेल या काळात कोणताही नवीन व्यापार सुरू करू नका त्याचबरोबर या काळात करिअर संबंधी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या काळात शनी वक्री राहील नोकरदारांनी या काळात जास्त मनापासून काम करणे आवश्यक राहील नाहीतर एखादी चूक होण्याची शक्यता आहे
आर्थिक स्थिती एप्रिल 2024 पर्यंत फारशी अनुकूल राहणार नाही चतुर्थातील शनी मुळे घरातील जबाबदाऱ्या वाढतील कुटुंबासाठी जास्त खर्च करावा लागेल यावर्षी स्थान परिवर्तन करावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ही खर्च वाढतील कदाचित एखादी जुनी मालमत्ता विकून तुम्ही हे खर्च भागवण्याचा प्रयत्न कराल
विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक वर्ष अनुकूल जाईल मात्र चतुर्थातील शनी मुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरील लक्ष कमी होऊन आळस वाढेल
कौटुंबिक जीवनात संपत्तीवरून काही वाद-विवाद होऊ शकतात त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंधात ताण-तणाव निर्माण होतील मे 2024 नंतर कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.एप्रिल 2024 पर्यंत प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही समस्या जाणवतील
मात्र मे 2024 नंतर प्रेम आणि विवाहासाठी हा काळ उत्तम असेल या काळात कुटुंबात एखादे विशेष कार्य संपन्न होईल 12 जून ते 24 ऑगस्ट हा काळ प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी चांगला राहील
मे 2024 नंतर तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते त्यासाठी बराच खर्चही करावा लागू शकतो तुम्हाला पाय दुखी सारखी समस्या वर्षभर जाणवू शकते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!