बहुविध वाचन लेखनाला प्रेरणा देते


लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन

सातारा

चांगला वाचकच चांगला लेखक होऊ शकतो. विविध प्रकारचे बहुविध वाचन नेहमीच चांगल्या लेखनाला प्रेरणा देते असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्यातर्फे आयोजित लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधताना मुकुंद फडके यांनी आपला लेखन प्रवास उलगडला

लहान वयात वृत्तपत्रात काम करण्यास सुरुवात केल्यामुळे वृत्तपत्र लेखनाच्या निमित्तानेच लेखनाला सुरुवात झाली आणि नंतर कथा अनुवादित कादंबऱ्या राजकीय लेख अशा प्रकारे ही लेखन प्रक्रिया विकसित होत गेली असे मुकुंद फडके यांनी सांगितले

वृत्तपत्रात काम करताना अनेक नियम आणि बंधने असल्याने लेखन शैलीवरही त्याचा परिणाम होतो असे सांगून ते म्हणाले, वृत्तपत्रात काम करताना एक नजर विकसित झाली असल्याने आसपास घडणाऱ्या घटनांच्या आधारेच लेखन केले जाते
यावेळी मुकुंद फडके यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक आठवणीचा उलगडा केला

Advertisement

आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी प्रास्ताविकात मुकुंद फडके यांचे स्वागत करताना त्यांचा मृदु स्वभाव, शांत व संयत लेखन आणि वास्तविकतेला शब्दरूप देण्याची त्यांची अनोखी क्षमता याचा उल्लेख केला. अनुभवी पत्रकार समाज बदलाच्या स्पंदनांना अर्थ देतो,अशी त्यांची लेखणी आहे असे गौरवउद्गार नानल यांनी काढले यावेळी त्यांनी अनेक नवीन उपक्रमाचे सुतोवाच केले.

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी यावेळी हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ संदीप श्रोत्री यांनी समूहातर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेची माहिती दिली

यावेळी डॉ हृषीकेश भिलारे यांच्या पोवाईनाका या दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती राऊत यांनी केले
आभार प्रदर्शन ऍड सीमंतिनी नुलकर यांनी केले
यावेळी श्रीकांत कात्रे,डॉ मोहन सुखटणकर,यशेंद्र क्षीरसागर, वि ना लांडगे,सविता कारंजकर मान्यवर उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!