पुण्यात २२ पासून बाल पुस्तक जत्रा
पुणे
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खास बालचमुंसाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’
आयोजित करण्यात आली आहे
२२ ते २५ मे २०२५या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे हि जत्रा भरणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना साहित्याचा स्पर्श व्हावा व त्यांच्यात वाचन संस्कृती रुजावी, यासाठी खास ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बालगोपाळांसमवेत पालक आणि शिक्षकांसाठीही नावीन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, खाऊ गल्लीत मुलांना चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. पालक आणि शिक्षकांनी पाल्यांसह या उपक्रमात आवर्जून सहभाग घेऊन, आपल्या पाल्यांना साहित्य जगताची अनोखी सफर घडवावी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक करावी असे आवाहन करण्यात आले आहे
बाल पुस्तक जत्रेमध्ये मराठी बाल आणि कुमार साहित्याचे भव्य पुस्तक प्रदर्शन,किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन,बाल साहित्य लेखन स्पर्धा,
मुलांचे कविसंमेलन,पपेट शो,पथनाट्य कार्यशाळा,लेखक तुमच्या भेटीला,चिंटू तुमच्या भेटीला,नाट्यनगरी कार्यशाळा,जादूचे खेळ आणि प्रशिक्षण ,विमान विज्ञान ही अनोखी कार्यशाळा,’आपले अंगण’ उपक्रमात मुलांना देशी खेळाची धमाल ‘मावळा खेळा’तून इतिहासाचा जागर आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत

