एक महिन्यात २ लाखाहून अधिक एक्स अकाऊंट सस्पेंड


एलन मस्कच्या सोशल मीडिया कंपनीचे भारतात रेकॉर्ड

नवी दिल्ली

Advertisement

एलन मस्कच्या सोशल मीडिया कंपनी एक्सने भारतात एक महिन्याच्या अंतराने लाखो अकाऊंट बॅन करून रेकॉर्ड केले आहे. एक्सने केवळ एका महिन्यात २ लाखाहून अधिक अकाऊंटवर कारवाई केली आहे
आधी ट्विटरच्या नावाने प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला ऑपरेट आणि मॅनेज करणारी कंपनी एक्स कॉर्पोरेशनने आपल्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये या कारवाईबद्दल माहिती दिली. कंपनीने सांगितले की त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील नियामांचे विविध उल्लंघन केल्याप्रकरणी मार्च महिन्यात २ लाख १२ हजार ६२७ अकाऊंट बॅन करण्यात आले.
जे अकाऊंट बंद करण्यात आले. त्यात अनेक मुलांसोबतच लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणारे होते तसेच परवानगीशिवाय न्यूडिटी पसरवत होते. याशिवाय भारतीय सायबर स्पेसमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यामुळे अनेक अकाऊंटवर कारवाई करण्यात आली. एक्सने सांगितले त्यांच्या २०२१च्या नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी करताना संबंधित अकाऊंटवर कारवाई कऱण्यात आली आहे.
महिन्याच्या रिपोर्टनुसार मार्च महिन्यादरम्यान १,२३५ अकाऊंटला इंडियन सायबर स्पेसमध्ये दहशतवादी पसरवल्याप्रकरणी बंद करण्यात आले आहे. याआधी कंपनीने २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान भारतातील ५ लाख ६ हजार १७३ अकाऊंट बंद केले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!