रविवारी सुमधुर गीतांची मेजवानी
यादें सिने संगीत क्लबतर्फे आयोजन
Advertisement
सातारा
रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी, सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत,पाठक हाॅल,नगर वाचनालय राजवाडा सातारा येथे यादें सिने संगीत क्लब यांच्या तर्फे सुमधुर गीतांची मेजवानी सादर केली जाणार आहे यावेळी किशोर कुमार, सुरेश वाडकर, मुकेश, लता व आशा भोसले, यांनी गायलेली गाणी क्लबचे सदस्य सादर करणार आहेत. मुकुंद पांडे, विजय साबळे, महेश बुटे, अरुण कुलकर्णी, ज्योती साळुंखे, विजया चव्हाण व आरती वाणी हे कलाकार गाणी सादर करतील निवेदन ॲड.स्नेहल कुलकर्णी, या करणार असुन ध्वनी व्यवस्था .सुभाष कुंभार यांची आहे. सर्व सातारकर रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन क्लबचे सेक्रेटरी अरुण कुलकर्णी यांनी केले आहे कार्यक्रम विनामूल्य आहे

