लोकमंगलच्या नागेवाडी शाळेचा बुधवारी पारितोषिक वितरण समारंभ


सातारा
येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विज्ञान प्रदर्शन बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजता लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी येथे होणार आहे
पारितोषिक वितरण व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर प्रेरणा उबाळे यांच्या हस्ते होणार असून यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, शशिकांत जाधव, नितीशकुमार कसबे, राहुल घोडके दिलीप सावंत ,रमेश महामुलकर यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!