वार्षिक राशिभविष्य 2024 कन्या रास


वार्षिक राशिभविष्य 2024
कन्या
एकूणच वर्ष प्रगतीचे जाईल

Advertisement


न्यूजमडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीचे लोक खूप समजूतदार असतात. हे लोक कोणतेही काम खूप मनापासून पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ नेहमी मिळते.या राशीच्या लोकांना फार बोलायला आवडत नाही आणि हे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात ज्यामुळे त्यांना याचा खूप जास्त त्रास होतो. हे लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जास्त गंभीर असतात. ते नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेतात.ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीचे लोक खूप नम्र आणि प्रेमळ असतात. हे लोक चांगले मित्र सुद्धा असतात आणि अडचणींमध्ये ते मित्राच्या मदतीला नेहमी धावतात. कोणत्याही कठिण परिस्थितीमध्ये ते सुरुवातीला घाबरतात पण नंतर हे लोक मार्ग काढतात. अनेकदा यांच्या चांगल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात.हे लोक बुद्धीमान असतात आणि वाईट कामांपासून ते स्वत:ला दूर ठेवतात. वाईट सवयी असलेल्या मित्रांपासून ते दूर राहतात. या राशीचे लोक आपल्या जवळच्या लोकांना नेहमी प्रोत्साहन देतात आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करतात.
वर्षाच्या सुरुवातीला शनी मंगळ कुयोगाचा भर राहील काहींना उष्णतेचे विकार जाणवू शकतात राजकारणातील लोकांना शत्रु पक्षाकडून त्रास होऊ शकतो या वर्षात अनेकांना नोकरी मिळेल व्यावसायिकांना चांगले लाभ होतील येणाऱ्या ग्रहणा दरम्यान सर्वच बाबतीत दक्षता घ्यावी लागेल बाकी अनेक नोकरदारांना पगार वाढ आणि बढती मिळेल अनेकांचे विवाह जमतील एकूणच वर्ष प्रगतीचे जाईल शनीचे भ्रमण तुमच्या सहाव्या स्थानातून होत असून राहू आणि केतूचे भ्रमण प्रथम आणि सप्तम स्थानातून होणार आहे ही गृह स्थिती फारशी चांगली नाही एप्रिल 2024 पर्यंत गुरु तुमच्या अष्टमास्थानात भ्रमण करतील त्यामुळे आर्थिक लाभाच्या बाबतीतही ही स्थिती फारशी अनुकूल नाही कारण अष्टमातील गुरुमुळे खर्च जास्त होतील आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील यावर्षी आर्थिक आघाडीवर तुम्ही पैसा चांगला कमवाल परंतु पैशांची बचत होणार नाही षष्ठातील शनीमुळे करियर मध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल पदोन्नती नवीन नोकरी पगार वाढ इत्यादी अनेक लाभ तुम्हाला मिळतील एप्रिल 2024 पर्यंतचा काळ तुम्हाला करिअर धनलाभ आणि नात्यान संदर्भात तितकासा अनुकूल राहणार नाही कारण गुरु अष्टम भावात राहील. 1 मे 2024 नंतर गुरु भाग्यस्थानात येईल. त्यामुळे तुम्ही अध्यात्मिक कार्यांमध्ये सामील होऊन मनशांती तसेच करियर आर्थिक लाभ आणि नात्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करू शकाल
एक मे 2024 नंतर करिअरमध्ये स्थिरता येईल परंतु राहू केतूच्या भ्रमणामुळे नोकरदारांनी काम करताना सावध राहणे आवश्यक राहील कारण कामाचा ताण खूप असेल आणि त्यामुळे चुका होण्याची शक्यता राहील 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी वक्री राहील या काळात नोकरदारांनी आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल सप्तम भावातील राहू मुळे नोकरीत विदेश यात्रेची संधी मिळेल
एप्रिल 2024 पर्यंत तुमची आर्थिक स्थिती फारशी अनुकूल राहणार नाही अष्टमातील गुरु आणि सप्तमात राहू यामुळे खर्च वाढतील प्रथमस्थानातील केतूही एखादे आर्थिक संकट निर्माण करू शकते मात्र एक मे 2024 नंतर भाग्यात येणाऱ्या गुरूमुळे चांगले आर्थिक लाभ होतील नवीन गुंतवणुकी करता येतील तरीही प्रथम स्थानातील केतूमुळे काही अनैच्छिक खर्च करावे लागतील विद्यार्थ्यांना यावर्षी चांगले यश मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील
यावर्षी कौटुंबिक आघाडीवर कुटुंबात अनेक आनंददायी घटना घडतील अष्टमातील गुरुमुळे मे 2024 पर्यंत कुटुंबात काही वादविवादही होऊ शकतात अष्टम भावावर शनीची दृष्टी असल्यामुळे घर आणि संपत्ती संबंधी काही वादविवाद होण्याची शक्यता आहे
प्रेम आणि विवाह या संदर्भात 2024 हे वर्ष अनुकूल नाही मात्र मे 2024 नंतर भाग्यातील गुरुमुळे प्रेम आणि विवाह संबंधात चांगली यश मिळू शकते
सप्तमातील राहूमुळे आरोग्याशी संबंधित तक्रारी जाणवतील पचनाशी संबंधित काही तक्रारी जाणवू शकतात परंतु षष्ठातील शनी आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यात मदत करेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!