हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट अनिवार्य


वाहनांना ३० मार्चपूर्वी करावी लागणार पूर्तता

Advertisement

मुंबई
बनावट नंबर प्लेट लाऊन होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेट वरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट” बसविणे अनिवार्य केलं आहे. ३० मार्च २०२५ पर्यंत ठाण्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक रहाणार आहे.
ठाण्यात व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या असल्याचा आभास होतो. रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे हे देखील समजून येत नाही कधी नंबर प्लेट नसणारी किंवा खोट्या नंबर प्लेट लावून वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र अशा वाहनांचा कळत नकळत एखादा गुन्हा घडला, तर त्याला शोधणे खूप अवघड होऊन जाते. अशा नंबर प्लेट वरून राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट” लावण्याची सूचना केली आहे. या बाबत राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वाहनांना ३० मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केलेआहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!