ऍपल देणार 5 लाख नोकऱ्या
तरुणांसाठी मोठी संधी
नवी दिल्ली
आयफोन निर्मिती करणारी कंपनी ऍपल या कंपनीमध्ये लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात ऍपल कंपनीमध्ये पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.देशातील युवकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. यामुळं भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे.ऍपल कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संदर्भानं हालचीलांना देखील वेग आलाय.
जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी 7 आयफोन हे भारतात तयार होतात 2030 पर्यंत याची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही तरुणासाठी मोठी संधी असणार आहे. ज्या युवकांना अॅपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे ऍपल कंपनीला भारतातील उत्पादन वाढवायचं आहे. आपल्या व्यवसायाचा या ठिकाणी मोठा विस्तार करायचा आहे. देशात स्थानिक मूल्यवर्धन 15 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.
