साताऱ्यात आज हिंदी व मराठी गीतांची मेहफिल


दीपलक्ष्मी पतसंस्था व रंगोली ग्रुपतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व रंगोली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हिंदी व मराठी गीतांची सुश्राव्य मेहफिल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना रंगोली ग्रुपची असून धनी व्यवस्था प्रमोद लोंढे सांभाळणार आहेत. यावेळी सुरेश सर, हेमंत सर ,चेतन सर, दुर्गा मॅडम, शुभांगी मॅडम, साक्षी मॅडम, हे गायक कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जोशी, काका पाटील, डॉक्टर कामिनी पाटील, मुकुंद फडके , शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!