पत्नीच्या रिलला कंटाळून पतीची आत्महत्या


आत्महत्येपूर्वी लाईव्ह येत सांगितले कारण.

जयपूर
बायकोच्या रील बनवण्याच्या सवयीने रील बनवू नकोस असे वारंवार सांगूनही बायको ऐकत नसल्याने त्रस्त पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अलवरमध्ये घडली आहे दोघांमध्ये वाद झाला आणि बायको घर सोडून माहेरी गेली.अखेर त्रस्त पतीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने लाईव्ह येत कारण सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
रैणी परिसरातील नांगलबास गावात राहणारा सिद्धार्थ दौसा हा तरूण आरोग्य विभागात कामाला होता.दीड वर्षांपूर्वी वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी लागली होती. त्यानंतर सिद्धार्थ याचा माया नावाच्या तरूणीशी विवाह झाला. 5 एप्रिलला सिद्धार्थने आत्महत्या केली आणि 6 एप्रिलला नातेवाईकांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. माया हिला सोशल मीडियावर रील बनविण्याची सवय होती. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ती रील बनवून टाकायची आणि लोकं त्यावर अश्लील कमेंट द्यायचे. मात्र पत्नीच्या प्रोफाईलवर येणाऱ्या अश्लील कमेंट वाचून सिद्धार्थला फार त्रास व्हायचा. यामुळे माया आणि सिद्धार्थमध्ये वाद होऊ लागले. सिद्धार्थने मायाला रील बनवू नको असे वारंवार सांगितले. मात्र माया ऐकत नव्हती. यामुळे दोघांमध्ये वाद वाढले आणि माया घर सोडून निघाली. तसेच तिने सिद्धार्थवर आरोप लावून त्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सिद्धार्थला दारू पिण्याचे व्यसन लागल्याने दोघांमध्ये वाद होत असल्याचे आरोप केले.

Advertisement

त्रस्त सिद्धार्थ अखेर लाइव्ह येत म्हणाला, ”मी आजपर्यंत एकही रील बनवला नाही. माझी काही चूक असेल तर कृपया मला कळवा. माझे मायाशी कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. ती माझ्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हा माझा एकमेव लढा आहे. मी माझ्या भावासोबत आहे जो एक समजूतदार माणूस आहे. तो स्वतः समजेल की कधीकधी कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या असतात. हे सर्व घरच्यांना माहीत आहे. शहाणी माणसे चांगल्या कमेंट करत आहेत. पण काही लोकं गलिच्छ कमेंट करत आहेत. जेव्हा काही लोक तुमच्या घरात घाणेरड्या कमेंट करत असतात.जेव्हा हे तुमच्या घरात घडते. मग तुम्हाला समजेल. मी माझे कुटुंब तुटलेले पाहू शकत नाही आणि ते तुटू देणार नाही. यासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही. तुम्हाला अशा अनेक बायका मुली भेटतील पण कुटुंब नाही. जर मी मेलो तर माझ्या भावाला वारसा हक्क मिळेल. माझ्या सासरच्या आणि बायकोशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या भावाला आणि त्याच्या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यांनाही सर्व प्रकारचे क्लेम मिळायला हवेत” असे तो त्यात म्हणाला. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!