‘ वोट चोरी के खिलाफ’ काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम


रणजीत देशमुख यांच्याकडून आरंभ
सातारा, ‘ वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू ‘ या उपक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहिमेला येथील जिल्हा काँग्रेस भवनातून अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी आरंभ केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत मतदार नोंदणीत गैरप्रकार करीत प्रत्यक्ष मतमोजणीत मतचोरी केल्याचा गंभीर आरोप केला . या आरोपानंतर देशभर सर्व विरोधकांनी एकजूट दाखवत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत आंदोलन केले. निवडणूक आयोगाविरुद्ध विविध उपक्रमांद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय झाल्यानंतर ‘ वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू ‘ या अंतर्गत स्वाक्षरी मोहीम जिल्ह्यावार सुरू करण्यात आली. काँग्रेस भवनात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या मोहिमेला जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सुरुवात केली .याप्रसंगी अल्पसंख्यांक सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण, सरचिटणीस राजेंद्र शेलार, संजय तडाखे, रजिया शेख, बाबासाहेब कदम आदी उपस्थित होते.

Advertisement

छायाचित्र ओळी

‘ वोट चोरी के खिलाफ..’ उपक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह देशमुख शेजारी झाकीर पठाण, संजय तडाखे, रझिया शेख आदि


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!