एक धागा सुखाचा


न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
वयाच्या 92 व्या वर्षी महिला घेतीय शिक्षण
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील मुस्लिम महिलेचा उपक्रम

 

लखनऊ
शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसती हा सर्वसाधारण नियम उत्तर प्रदेशामधील एका 92 वर्षीय महिलेने सिद्ध करून दाखवला आहे उत्तर प्रदेश मधील बुलंदशहर या शहरातील एका 92 वर्षीय मुस्लिम महिलेने शाळेत प्रवेश घेतला असून प्राथमिक शिक्षण घेण्यास प्रारंभ केला आहे सलिमा खान असे या मुस्लिम महिलेचे नाव असून तिचा जन्म 1931 मध्ये झाला होता वयाच्या चौदाव्या वर्षी तिचे लग्न झाल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेता आले नाही पण आता वयाची 90 वर्षे ओलांडल्यानंतर आणि घरात नातवंडे पतवंडे असताना सुद्धा तिच्या मनात पुन्हा एकदा शिक्षण घेण्याची भावना जागृत झाली आणि शहरातील एका शाळेत प्रवेश घेऊन तिने ह्या शिक्षणाचा उपक्रम सुरू केला ज्या लहान वयात तिला शिक्षणाची इच्छा होती तेव्हा तिच्या गावांमध्ये कोणती शाळा उपलब्ध नसल्याने तिला शिक्षणापासून वंचित रहावे लागले होते ती इच्छा ती सध्या पूर्ण करत आहे 6 महिन्यापूर्वी तिने शाळेत प्रवेश घेतला तेव्हा तिच्या वर्गातील इतर विद्यार्थी तिच्यापेक्षा 80 तव 85 वर्षांनी लहान होते महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलिना खानच्या नातवाची पत्नी म्हणजे सलीमा खानची नातसूनच तिला शाळेत घेऊन जाते 92 व्या वर्षी सलीमा खान शाळेत शिक्षण घेत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट जगासमोर आली आणि सर्वांनी तिचे कौतुक केले सलीमा ने या शाळेत जायला सुरुवात केल्यानंतर याच गावातील आणखी 25 महिलांनी सुद्धा शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला ज्या शाळेमध्ये सलीमा खानने प्रवेश घेतला आहे त्या ठिकाणी तिथे तिला प्रवेश देता येईल की नाही याबाबत सर्वात प्रथम शंका व्यक्त करण्यात येत होती पण जेव्हा तिला वयाच्या आधारे शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही हा नियम समोर आला तेव्हा वयाच्या 92 व्या वर्षी सुद्धा या शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला सलीमा खान या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे उद्गार या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शर्मा यांनी काढले आहे मोठ्या वयात प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा विक्रम कदाचित सलीमा खानच्या नावावरून नोंदवला जाऊ शकतो याबाबत गिनीज बुकचे अधिकारी सुद्धा सध्या चाचपणी करत आहे

 

 

न्यूजमंडी/ज्ञानकोश
निवडणूक खर्च

निवडणूक खर्च अहवाल
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर या काळात उमेदवाराने केलेल्या खर्चाचा तपशील केंद्रीय निवडणूक आयागाने निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे म्हणजेच जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा रिटर्निंग अधिकाऱ्याकडे 30 दिवासाच्या आत जमा करणे आवश्यक आहे. निवडूक खर्चाचे रजिस्टर बँक खात्याचे स्टेटमेंट याची निवडणूक खर्च अधिकाऱ्यांकडून पडताळणी करणे देथील आवश्यक आहे. समजा उमेदवाराने दुसऱ्या खात्याचा वापर केला, अथवा निवडणूक कालावधीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर त्यास लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 10A अंतर्गत तीन वर्षांपर्यंत अपात्र ठरवले जाऊ शकते. या प्रमाणे सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना लोकसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे त्यांच्या निवडणूक खर्चाचे विवरण सादर करावे लागते.
.

 

न्यूजमंडी/सुविचार
१. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.

२. जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता. तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका.

३. बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते सध्या करा.

 

 

न्यूजमंडी/विनोद

Advertisement

खड्डे
एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…

आनंद
माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलिस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…

अपेक्षा
एका मित्राने मला दहा हजार रुपये मागितले…
मी म्हटलो – पैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून
तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली…
लय, बरं वाटल.

 

 

 


न्यूजमंडी/खाद्ययात्रा
पनीर टिक्का मसाला

साहित्य
250 ग्राम पनीर 2 छोट्या शीमला मीर्ची 1 मोठा टमाटा 1 मोठा कांदा मँरीनेशन साठी मसाला 100 ग्राम घट्ट घरचे फ्रेश दही 1 1/2 टेबलस्पून बेसन 8. 1 टीस्पून तीखट 1 टीस्पून जीर पूड 1 टीस्पून मीठ 1 टीस्पून गरम मसाला 1/2 टीस्पून पिठी साखर 1 टेबलस्पून बटर वरून लावायला, ग्रेव्ही साठी मसाला. 2 मोठे कांदे (1 जाड चीरून 1 फाईन बारीक करून) मीडीयम साईज टमाटे 3 लाल सूकी मीर्ची 6-7 काजू 1 टीस्पून जीर 1 टेबलस्पून तेल 1 टेबलस्पून कोथिंबीर धूवून चीरलेली फोडणी साठी 3 टेबलस्पून तेल 2 टेबलस्पून बटर 1 टीस्पून जीर 7-8 लसून पाकळ्या 1 टेबलस्पून तीखट 1 टीस्पून हळद 1 टीस्पून कीचनकींग मसाला 1 टीस्पून गरममसाला 1/2 टीस्पून हळद 1 टेबलस्पून धणे पूड सवॅ विद नान,चपाती,राईस।

कृती
प्रथम पनीर, ग्रीन शीमला मीरची,कांदा आणी बिया रस वेगळा करून कडक लाल टमाट्याचे स्वेअर तूकडे कापून घेणे नंतर दही एका मोठ्या वाटी मधे घेऊन त्यात मेरीनेशन साठी घेतले मसाले टाकणे .दह्यात मसाले टाकून छान मीक्स करणे. थोडी पिठी साखर टाकून मीक्स करणे. त्यात प्रथम पनीर टाकून मीक्स करून घेणे.पनीर मेरीनेट झाले की त्यात शीमला मीर्ची,टमाटा,कांदा स्वेअर पिस मधे कट केलेला टाकणे टॉस करणे पनीर तूटू न देताआणी 15 मिनिटे फ्रीज मधे ठेवून देणे
आता ग्रेव्ही साठी कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करणे जीर टाकणे ते तडतडले की 1मोठा कांदा जाडसर चीरलेला टाकणे तो लालसर परतणे सोबत लाल मीर्ची पण टाकणे.परततांना 1/2 टीस्पून मीठ टाकणे कांदा पटकन लाल होतोनंतर त्यात चीरलेले टमाटे टाकणे काजू टाकणे..।2 मिनिटे परतून गॅस बंद करणे कोथिंबीर टाकणे थंड करून मीक्सरच्या पॉटमधे बारीक करणे नंतर 1/2 कप पाणी टाकून पेस्ट बनवणे.आता मेरीनेशन केलेले पनीर भाज्या स्टीकला लावणे…
वरून ब्रशने बटर लावून गॅसच्या आचेवर ग्रील ठेवून कीवा जाळावर स्टिक धरून जरा भाजून घेणे सगळे तयार पनीर भाज्या स्टिकला लावून ग्रील करून घेणे…आता गँसवरच त्याच कढईत तेल आणी बटर टाकून गरम करणे बारीक चीरलेला 1 मोठा कांदा टाकणे…लालसर झाला की त्यात बारीक केलेला ग्रेव्ही मसाला टाकणे. आणी मेरीनेशन चा ऊरलेला मसाला पण टाकणे अद्रक,लसूण कूटून बारीक टाकणे…तेल सूटे पर्यंत परतणे..थोड पाणी टाकणे (मसाला जळू नये म्हणून) नी बाकी राहीलेले मसाले टाकणेपरत 2 मिनिटे परतून 1 ते 1 1/2 कप पाणी टाकून झाकण ठेवून ऊकळू देणे..नंतर त्यात तयार पनीर टिक्का टाकणे मीक्स करून मीठ,साखर टाकणे क्रीम आणी बटर टाकणे मीक्स करून मीडीयम आचेवर झाकण ठेवून 2-3 मिनिटे शीजवून घेणे .

 

 

 

न्यूजमंडी/भविष्य
मेष मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटीने सुखावून जाल.

वृषभ आजचा संपूर्ण दिवस कार्यमग्न राहाल.

मिथुन आजच्या दिवसाचे योग्य नियोजन करा

कर्क आजचा दिवस काहीसा कष्टदायक जाऊ शकतो.

सिंह आज प्रसन्न, आनंदी राहाल.

कन्या नकारात्मकता, नैराश्य जाणवेल.

तुळ आजच्या दिवशी उत्तम संततीसौख्याची प्राप्ती कराल

वृश्चिक आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्य लाभेल

धनु बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल.

मकर आज काही धनप्राप्तीचे योग देखील संभवतात.

कुंभ काही नवीन कामे हाती घ्याल.

मीन नको त्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!