गंगू रामसे यांचे निधन
हॉरर चित्रपटांच्या निर्मितीसाठी होते प्रसिद्ध
मुंबई
हॉरर चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या रामसे बंधुपैकी ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचे निधन झाले. 83 वर्षीय गंगू रामसे हे गेल्या एक महिन्यापासून आजारी होते. एक महिन्यापासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते.
गंगू रामसे लोकप्रिय रामसे ब्रदर्स टीमचा एक भाग होते. कुमार रामसे, केशू रामसे, तुलसी रामसे, किरण रामसे, श्याम रामसे, गंगू रामसे, अर्जुन रामसे या सात भावांमध्ये गंगू हा दुसरा मोठा भाऊ होता. हे सर्व जण प्रसिद्ध चित्रपट निर्माते एफ.यू. रामसे यांची मुले होती . त्यांच्या टीमचे नाव रामसे ब्रदर्स होते, जे एकत्र चित्रपट बनवत असत. टीममध्ये थोरला भाऊ कुमार रामसे यांनी पटकथेवर काम केले, गंगूने छायांकन केले, किरण रामसेने साऊंड काम केले, केशूने निर्मिती आणि अर्जुनने संपादन केले, तर श्याम-तुलसीने मिळून दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली.या टीमचा पहिला चित्रपट 1972 चा दो गज जमीन के नीचे होता. पुढे त्यांनी अंधेरा, दरवाजा, और कौन, सबूत, गेस्ट हाऊस,, पुराणा मंदिर, तहखाना, वीराणा, पुरानी हवेली यांसारखे हॉरर चित्रपट बनवले आहेत. चित्रपटांशिवाय रामसे ब्रदर्स हॉरर शो करूनही चर्चेत होते. हा शो 1993-2001 पर्यंत चालला.
