एक जून रोजी पाचगणीत काव्य महोत्सव


महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा वाई यांच्यातर्फे आयोजन
सातारा
महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा वाई यांच्यातर्फे रविवार, 1 जून 2025 रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय काव्य महोत्सवआयोजित करण्यात आला आहे
महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात कवी आणि कवियत्रींची शब्दसुमने फुलणार असून यावेळी महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे प्रमुख पाहेन म्हणून उपस्थित राहणार असून काव्य महोत्सव अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध कवीलक्ष्मीकांत रांजणे असतील
हॉटेल मिलेनियम पार्क, पाचगणी येथे सकाळी 9:30 ते सायंकाळी 4.00 पर्यंत हा महोत्सव होणार आहे यासाठी सहयोग शुल्क – कवींसाठी – 900/- रुपये श्रोत्यांसाठी – 600/- रुपये आहे
थ्री स्टार कॅटेगिरीच्या हॉटेल ऑडिटोरियममध्ये अतिशय उत्कृष्ट ठिकाणी कविता सादर करण्याचा बहुमान मिळणार असून सहभागी प्रत्येक कवींना सन्मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.कवींना महाबळेश्वर-पाचगणी येथील प्रसिद्ध धनंजय फूड्स यांचे गिफ्ट हँम्पर देण्यात येईल
कविता सादर करणाऱ्या कवींची संख्या मर्यादित असेल.गजल, बोली भाषेतील कविता, हास्य कविता, मुक्त छंद आणि इतर कवितांचा समावेश असेल कविता स्वरचित असणे अनिवार्य आहे कविता ही सामाजिक तेढ निर्माण करणारी किंवा राजकीय, धार्मिक अथवा इतर कोणताही वादंग निर्माण करणारी नसावी, असे झाल्यास त्यासाठी कवी स्वतः जबाबदार असेल.
अधिक माहितीकरिता विलास पिसाळ मो. 9975741000 किंवा क्रांती पाटील मो. 9921503552 या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!