तर पाकिस्तानात घुसून मारू


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाथेट इशारा

Advertisement

नवी दिल्ली :
जर एखादा दहशतवादी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही त्याला घुसून ठार करू. भारतातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणत्याही दहशतवाद्याने केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशत पसरवणाऱ्या पाकिस्तानला थेट आणि कडक शब्दात इशारा दिला आहे. नेटवर्क 18 चे एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरुद्ध सरकारी भूमिका स्पष्ट केली.
‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, देशात कोणत्याही दहशतवाद्याने कोणत्याही प्रकारची घटना घडवली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. दहशतवादी घटना घडवून एखादा दहशतवादी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू.
राजनाथ सिंह म्हणाले, ‘जर दहशतवादी पाकिस्तानात पळून गेले तर आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन संपवू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्यच सांगितलंय… भारताकडे ती क्षमता आहे. आता ही गोष्टी पाकिस्तानच्या लक्षात आली आहे’
ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, भारत सरकारने दहशतवाद्यांना समूळ नष्ट करण्याची योजना आखली आहे. यात अगदी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र विभागाने हा अहवाल खोटा ठरवून हा भारतविरोधी प्रचार असल्याचे म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!