डॉ. माधव गाडगीळ यांना रविवारी साताऱ्यात श्रद्धांजली
रानवाटा आणि पुस्तकप्रेमी समूहातर्फे आयोजन
सातारा:
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आणि परिसर शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूह आणि ‘रानवाटा निसर्ग व पर्यावरण संवर्धन मंडळ’ या संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात ही सभा होणार आहे. डॉ. गाडगीळ यांचे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनातील योगदान अविस्मरणीय असून, या शोकसभेला सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूहाचे डॉ. संदीप श्रोत्री व ‘रानवाटा’ मंडळाचे श्री. पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे.

