साताऱ्यात मंगळवारी सुरसंगम सदाबहार नगमे कार्यक्रम


सातारा

Advertisement

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सुरसंगम सदाबहार नगमे हिंदी गाण्यांचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गवळी,श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वाती शेडगे, जस्मिन शेख, साधना धनवडे ,शहाबुद्दीन भाई, युनुसभाई, सुनील धनवडे, नासिर पालकर, शरीफ सलाती,राजेश वंजारी, शब्बीर तांबोळी ,अमोल जाधव,फारुख भाई, तुषार पाटील हे गायक कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत.कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी कलाकार स्टुडिओ सातारा यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे शिरीष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!