यशोदा पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चमकदार कामगिरी
विद्यार्थ्यांना कमिंस इंडिया, जॉन डियर या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मोठी पसंती
सातारा
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये कमिंस इंडिया, जॉन डियर, या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्ह द्वारे घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये तब्बल 90 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील पॉलीटेक्निकच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचे निवड झाली. सातारा जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेजेस साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये या प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील आठ पॉलिटेक्निक कॉलेजेसनी यामध्ये सहभाग घेतला होता. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील पॉलीटेक्निक विद्यार्थ्यांची विविध कंपन्या द्वारे निवड करण्यात आली. यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक ला एनबीए मानांकन देखील प्राप्त झाले आहे. दर्जात्मक शिक्षण आणि सातत्य यामुळेच यशोदा कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक ला प्रथम प्रयत्नातच हे मानांकन प्राप्त झाले आहे.
देशातील नामांकित कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट साठी टेक्निकल कॅम्पसला पसंती दिल्याचे दिसते. त्यामध्ये, कमिन्स इंडिया, जॉन डियर या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने देखील यशोदाचे विद्यार्थी निवडण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग नोंदवला. कमिन्स इंडिया लिमिटेड ही बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या विविध उपक्रमांसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी ओळखली जाते. कमिन्स सारख्या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळावी यासाठी विद्यार्थी नेहमीच प्रयत्न करत असतात.
व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांना रोजगारबीमुख बनवणे आणि उत्तम उत्तम करिअरच्या संधी बहाल करणे हेच असते. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे वेध लागतात. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये कार्यरत असणारा स्वतंत्र प्लेसमेंट सेल शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना विविध ट्रेनिंग प्रोग्राम्सद्वारे कौशल्य विकासावर काम करतो, . कौशल्य विकासाच्या कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येते. . यामध्ये नामांकित कंपन्यांना पाचारण करण्यात येते. सर्वसाधारणपणे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधी नोकरीची संधी हातात असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. म्हणूनच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे काम अत्यंत महत्त्वाचे असे आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिमत्व विकास, स्पोकन इंग्लिश, मुलाखती संदर्भातील अचूक मार्गदर्शन याचे महत्त्व अनन्यासाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये करिअरची दिशा मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. यशोदा टेक्निकल कॅम्पस ही दशकाहून अधिक अनुभव असलेली अग्रगणने शैक्षणिक संस्था असून येथे उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञांचे सखोल मार्गदर्शन आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी असणारे उच्चतम शैक्षणिक वातावरण यामुळेच प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये यश संपादन करता येते असे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रवीण गावडे यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या या प्लेसमेंट साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सोबत, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक आदींनी प्रयत्न केले. कॅम्पस प्लेसमेंट मधून मुलाखतीमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कुलसचिव, प्राचार्य, विभाग प्रमुख आदींनी विशेष कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी:
कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संस्थापक-अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, सहसंचालक, प्राचार्य, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, विभाग प्रमुख आणि शिक्षक

