हिंदूंनी संघटनासाठी आणि सक्षमीकरणासाठी वेळ देणे आवश्यक
विराट हिंदू संमेलनामध्ये निलेश धायरकर यांचे आवाहन
सातारा
देशात इतर धर्मांचे आक्रमण वाढत असताना देशातील हिंदूंनी संघटनासाठी आणि सक्षमीकरणासाठी वेळ देणे आवश्यक आहे असे आवाहन विवेक विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक निलेश धायरकर यांनी केले. देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याने हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही यावरही त्यांनी जोर दिला.
येथील समर्थ सदन येथे सकल हिंदू समाजातर्फे समर्थ भाग विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय होलार समाज साताराचे जिल्हाध्यक्ष दादासो शिवाजी आवटे होते
इतर धर्मातील व्यक्ती ज्याप्रमाणे आपला धर्म वाढवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देतात, पैसा देतात आणि इतर संसाधनेही देतात, त्याचप्रमाणे हिंदूंनी सुद्धा आपल्या धर्माच्या बळकटीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे यावेळी निलेश धायरकर म्हणाले. हिंदू संस्था, हिंदू संघटना, हिंदू विचार वाढवणाऱ्या आणि राबवणाऱ्या सामाजिक संस्था यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे असेही ते म्हणाले
इतर धर्मीय आपल्या धर्माचे पालन मनापासून आणि न लाजता करतात मग हिंदूंनीच आपला धर्म पाळताना संकोच का करावा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला
विराट हिंदू संमेलनातील दुसरे वक्ते समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश भाऊ रामदासी यांनी सुद्धा फक्त संकटकाळातच हिंदू एकत्र येतो असे सांगितले. पण मुळात असे संकट येण्याची वाट न पाहता हिंदूंचे संघटन अशा संकटापूर्वीच व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
विराट हिंदू संमेलनातील तिसऱ्या वक्त्या अनुजा प्रभुणे यांनी पर्यावरण विषयक मांडणी केली. दैनंदिन आयुष्यामध्ये पर्यावरणाचा विचार करून कशाप्रकारे सकारात्मक पद्धतीने जगता येईल हे त्यांनी स्पष्ट केलेसुरवातीला हिंदवी पब्लिक स्कुल च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले त्याचे माहितीपर प्रास्ताविक प्रसाद जोशी यांनी केले त्यानंतर नारायणी समूहाच्या महिलांनी रामतांडव आणि हनुमान तांडव स्तोत्र सादर केले
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाला सुरुवात झाली संमेलनाचे प्रास्तविक श्री विशाल देशपांडे यांनी केले सौ अनुजा प्रभुणे यांचा सत्कार संमेलनाच्या उपाध्यक्षा सौ अपर्णा कुलकर्णी यांनी केला योगेशबुवा रामदासी यांचा सत्कारसंमेलन समिती सदस्य नंदकुमार सावंत यांनी केला प्रमुख वक्ते निलेश धायरकर यांचा सत्कार संमेलन समिती सदस्य डॉ श्री संजयकुमार कोरे यांनी केला संमेलन अध्यक्ष दादासो आवटे यांचा सत्कार संमेलन समिती सदस्य मंगेश गोगावले यांनी केला सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशनाच्या हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघ यात्रा या विशेषांकाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
सूत्रसंचालन सौ संपदा देशपांडे यांनी केलेसचिन सावंत यांनी आभार मानले त्यानंतर सामूहिक पसायदान झाले
प्रसाद वाटप होऊन संमेलनाची सांगता झाली
फोटो ओळ
हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघ यात्रा या विशेषांकाचे प्रकाशन करताना योगेशबुवा रामदासी,निलेश धायरकर,दादासो आवटे,अनुजा प्रभुणे

