सत्यासाठी झुंजण्याची ताकद साहित्य देते- किरण माने
सातारा
सत्यासाठी झुंजण्याची ताकद साहित्य देते..साताऱ्याच्या मातीने अनेक चांगले चांगले साहित्यिक दिलेले आहेत. या मातीचा मला अभिमान आहे ही माती झुंजण्यासाठी धैर्य देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते किरण माने यांनी केले.अश्वमेध ग्रंथालय व स्वागत समिती सदस्य यांच्या विद्यमाने आयोजित प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलनाचे समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते प्रमुख पाहुणे म्हणून किरण माने उपस्थित होते.तेव्हा ते बोलत होते.
या कार्यक्रमात ऍड शंकर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.मंचावर अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने, स्वागत समिती अध्यक्ष प्राध्यापक श्रीधर साळुंखे , डी एम मोहिते उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना किरण माने म्हणाले,’महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे आद्य नाटक होते. व्यवस्थेविरुद्ध एका शेतकऱ्याने दिलेला लढा यात होता पण या नाटकाची दखल घेतली गेली नाही. डॉक्टर आ ह साळुंखे यांनी लिहिलेले बळीवंश ,विद्रोही तुकाराम यासारखे ग्रंथ समाजाचे प्रबोधन करणारे आहेत.शोषण करणारी संस्कृती समाजहित करत नाही.त्यामुळे विवेक शाबूत ठेवणे गरजेचे आहे. साताऱ्याची माती ही समृद्ध आहे. इथून क्रांती निर्माण होते
यावेळी लेखक ॲड शंकर निकम यांनी जुन्या ग्रंथातील अनेक दाखले देत त्यावरची सत्यासत्यता पडताळणे कसे गरजेचे आहे हे सांगून अशी प्रतिभा गौरव समाज प्रबोधन सारखी साहित्य संमेलने ते करण्यासाठी लेखकांना बळ देतील.सातारा जिल्ह्यातील लेखकांच्यासाठी हे संमेलन पथदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना रवींद्र भारती यांनी अश्वमेध ग्रंथालय हे सातत्याने साहित्यिक कार्यक्रम करत असते .साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते .आणि असेच साहित्य समाजाचे प्रबोधन करते. या संमेलनाचेही हे दुसरे वर्ष आहे .वाचक, श्रोत्यांनी अशा कार्यक्रमांना प्रतिसाद देत राहणे गरजेचे आहे सांगून हे संमेलन त्याचे सातत्य टिकवून ठेवेल असे मत व्यक्त केले.
या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कदम यांनी केले.
आभार डी एम मोहिते यांनी मानले.
दुपारी कवी प्रदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले.या संमेलनात आर डी पाटील, शुभांगी कुंभार, मनीषा शिरटावले, अश्विनी कोठावळे, वसुंधरा निकम, नरेंद्र निकम ,संगीता केंजळे ,विजय कदम रंजना सानप ,सुरेखा कुलकर्णी, कांता भोसले ,अंजली गोडसे ,रमाकांत देशपांडे डॉ अच्युत गोडबोले, सुभाष गुरव, डॉक्टर शैलजा माने आणि वसंत शिंदे या मान्यवर कवींचा सहभाग होता .
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले कवी संमेलनाचे प्रास्ताविक डॉक्टर आदिती काळमेख यांनी केले.
यावेळी गौतम भोसले ,स्वप्निल शिंदे डॉक्टर अशोक भोईटे ,डॉक्टर मोहन सुखठणकर,एडवोकेट श्रीकांत केंजळे,वसंत शिंदे डॉ शामला माने,निलेश महीगावकर एडवोकेट सीमंतिनी नुलकर रोहिणी माने ,मनीषा भारती,निलेश पवार शुभम तंटक , दुर्गेश भारती, शिवानी भारती उपस्थित होते.
फोटो ओळ
भाषण करताना किरण माने सोबत ॲड शंकर निकम, डॉ राजेंद्र माने ,रविंद्र भारती, श्रीधर साळुंखे

