ज्येष्ठांनी मानसिक स्वास्थ्य जपून उमेदीने जगावे


उमेद ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात डॉक्टर प्रसन्न दाभोलकर यांचे आवाहन

सातारा

ज्येष्ठ नागरिकांनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपून उमेदीने उर्वरित आयुष्य जगायला हवे, असे आवाहन प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न दाभोलकर यांनी केले.

येथील उमेद ज्येष्ठ नागरिक संघातर्फे डॉ दाभोळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते.
डॉक्टर दाभोलकर म्हणाले, वय वाढलं की काही नैसर्गिक आजार येतातच. पण त्यातही नागरिकांनी आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.अस्वस्थता चिंता किंवा जगण्याचा उत्साह नसणे या आजारापासून दूर राहिला हवे. ज्येष्ठांना अनेक वेळा विस्मरणाचा आजार होतो.त्यासाठी बुद्धी सतत तरतरीत ठेवायला हवी. अनेकवेळा ज्येष्ठांच्या मनामध्ये गोंधळाची अवस्था निर्माण होते. आपली मानसिक स्थिती विचलित होत आहे हे लक्षात आल्यास त्यांनी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.

डॉक्टर दाभोलकर म्हणाले, ज्येष्ठत्वाच्या कालावधीमध्ये उत्तम आयुष्य जगण्यासाठी इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि अशी भावना कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच सातत्याने समाजात मिसळणे आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणे सुद्धा महत्त्वाचे असते. मानसिक आरोग्याबरोबरच आपले शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी ज्येष्ठांनी नियमित व्यायामही करायला हवा.

Advertisement

आपल्याला आनंद मिळतो म्हणून आणि इतरांना आनंद देता येतो म्हणून आपण जगत असतो. ज्येष्ठांनी आयुष्यभर हीच भावना कायम ठेवावी. वयाच्या या अवस्थेतही आपण इतरांना हवेहवेसे वाटलो पाहिजे असे आवाहनही डॉक्टर दाभोलकर यांनी केले.
अध्यक्ष अशोक कानेटकर यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ दाभोलकर यांचे आभार मानले.
प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले. सचिव विजयकुमार फडणीस यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य दिलीप देव आणि दत्तात्रेय देगावकर यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. त्यांची माहिती विश्वास लिमये यांनी सादर केली. सुरेश शिकार खाने यांनी डॉक्टर प्रसन्न दाभोलकर यांची ओळख करून दिली.अशोक कानेटकर,दिलीप चरेगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन विजयकुमार फडणीस यांनी केले.आभार प्रदर्शन मुकुंद फडके यांनी केले.
यावेळी फेसकॉमच्या संचालक सौ सुजाता कानेटकर आवर्जून उपस्थित होत्या.

फोटो ओळ
डॉ प्रसन्न दाभोलकर यांचा सत्कार करताना अशोक कानेटकर,दिलीप चरेगावकर,सौ सुजाता कानेटकर, विजयकुमार फडणीस.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!