संस्कार भारतीच्या कथाकथन स्पर्धेबाबत उत्सुकता
मान्यवरांच्या उपस्थितीत २ ऑकटोबरला होणार उदघाटन
सातारा
मराठी साहित्यात कथाकथन हा साहित्य प्रकार लोकप्रिय करणारे कै द मा.मिरासदार, शंकर पाटील व व्यंकटेश माडगूळकर ह्या त्रयिंच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्कारभारती सातारा समितीने कथाकथी 26 ही 18 वर्षावरील सर्वांसाठी कथाकथन स्पर्धा येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता कला व वाणिज्य कॉलेजच्या श्री शाहू हॉलमध्ये आयोजित केली आहे.असा उपक्रम प्रथमच राबवण्यात येत असल्याने या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या स्पर्धेचे उदघाट्न सातारा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था सातारा चेअरमन .जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक शिवराज ढाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास संस्कारभारती पश्चिम प्रांताचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत अठरा वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी ही स्पर्धा खुली असून स्पर्धकांनी द मा मिरासदार ,शंकर पाटील किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्याही कथेचे वैयक्तिक किंवा सामुदायिक सादरीकरण करावयाचे आहे. सामुदायिक पद्धतीने सादरीकरण करत असताना सहभागी सदस्यांची संख्या कमाल 4 असावी. प्रत्येक स्पर्धकाला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे .आपले सादरीकरण करत असताना स्पर्धक वेशभूषा, केशभूषा,रंगभूषा अथवा पार्श्वसंगित याचा वापर करू शकतात. सातारा जिल्हा पातळीवर तीन क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना अंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पुणे येथे 15 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.
या कथाकथन स्पर्धेसाठी 500 रुपये प्रवेश फी असून स्पर्धकांचे सादरीकरण झाल्यावर त्यातील 300 रुपये त्यांना त्वरित परत केले जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी
दिलीप चरेगावकर 9921958042
प्रदीप ईनामदर कराड 9403771950
डॉ सुनील देशपांडे वाई 9423865458
मुकुंद फडके 9552593297
संजीव आरेकर 8149912687
रसिका केसकर 9420630374
यांच्याशी 30 सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा.
तरी या कथाकथन कार्यक्रमास शाहूवासिय नागरिकांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्कारभारतीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर,सचिव प्रदीप ईनामदार ,सहसचिव संजीव आरेकर,नाट्याविधाप्रमुख सौ रसिका केसकर व प्रसिद्धी प्रमुख मुकुंद फडके यांनी केले आहे.

