साताऱ्यात सोमवारी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था व सुकूनतर्फे आयोजन
सातारा:
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व अमरेंद्र रविंद्र मोटेसर द्वारा “सुकून” यांच्या संयुक्त विद्यमाने माय मराठीची… गाणी अवीट गोडीची हा सुमधुर नव्या जुन्या मराठी कराओके गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी 5.30 वा. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मा. वसंत जोशी, मा. काका पाटील, मा. सुरेखा शेजवळ आणि मा. शिरीष चिटणीस, चेअरमन, दीपलक्ष्मी नागरी सह. पतसंस्था, सातारा उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायक कलाकार प्रशांत उत्तेकर, ओमप्रकाश उधानी, विनायक लोहार, जुबेर शेख, वैशाली केसकर, मार्गदर्शक रविंद्र मोटे सर आणि संगीता वाघमारे मॅडम विविध मराठी गीते सादर करणार आहेत. सर्वांनी या विनामुल्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!