दिनांक २२, २३ ऑगस्टला रंगणार ‘मधुसूर’ स्पर्धेचा जल्लोष
सातारा
अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली ‘मधुसूर’ राज्यस्तरीय संगीत स्पर्धा (वर्ष ५ वे) यावेळी दिनांक २२, २३ ऑगस्टला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रेक्षागृहात संपन्न होत आहे. शास्त्रीय गायन आणि सुगम संगीताच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून ९० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झालेले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. राजेंद्र सरकाळे, श्री. राजेंद्र चोरगे, कु. शुभ्रा खाडे यांचे हस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभ श्री. बाळासाहेब मिरजकर, श्री. विद्यासागर अध्यापक, डॉ. वैशाली जाधव यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. स्पर्धेला विशेष उपस्थिती मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. ना. श्री. मकरंद (आबा) जाधव-पाटील, मा. खा. श्री. नितीनकाका जाधव-पाटील यांची असणार आहे. सर्व संगीतप्रेमींनी या राज्यस्तरीय संगीत स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अॅड. अमित द्रविड यांनी केले आहे.

