साताऱ्यात रविवारी वन फुल हा गाण्यांचा कार्यक्रम
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने ममता नरहरी प्रस्तुत वन फुल हा सदाबहार हिंदी गाण्यांचा कार्यक्रम रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना आणि निवेदन गायिका ममता नरहरी यांचे असून त्यांच्यासोबत गायक कलाकार विजय साबळे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जोशी, गजानन दीक्षित, स्मिता कोरपे, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था अक्षता व सचिन शेवडे सांभाळणार आहेत.सर्वांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरिष चिटणीस व ममता नरहरी यांनी केले आहे.

