साताऱ्यात आज सुरसंगम सदाबहार नगमे कार्यक्रम


सातारा

Advertisement

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सुरसंगम सदाबहार नगमे हा गाण्यांचा कार्यक्रम बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पतसंस्थेच्या सभागृहामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक शाबुद्दीन शेख ,युनुस शेख असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा शेजवळ ,मुकुंद फडके, श्रीराम नानल, गजानन दीक्षित उपस्थित राहणार आहेत. ध्वनी व्यवस्था युनूस शेख सांभाळणार असून या कार्यक्रमामध्ये दिपाली गीते, स्वाती शेडगे, जस्मिन शेख, अरुणा नाझरे, तुषार पाटील, अमोल जाधव,शरीफ सलाती कपिल राऊत, नासिर पालकर हे कलाकार गाणी सादर करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे शिरिष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!