रविवारी राज्यस्तरीय काव्य संमेलन


समाजोन्नती प्रतिष्ठानतर्फे आयोजन
सातारा
समाजजोन्नती प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यातर्फे रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सातारा येथे राज्यस्तरीय काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे संमेलन रविवार दिनांक 22 रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हेरिटेजवाडी रिसॉर्ट कास पठार येथे होणार आहे

Advertisement


संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी संमेलन अध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्रसाहित्य परिषदेचे सातारा प्रतिनिधी रवींद्र बेडके स्वागताध्यक्ष असणार आहेत या काव्य संमेलनाचे अध्यक्षपद पिंपरी चिंचवड येथील राजन लाखे भूषवणार आहेत
या आगळ्यावेगळ्या काव्य संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन सभा समाजोन्नती प्रतिष्ठानचे समूह संचालक संगीता माने दत्तात्रय निकम पाटील लक्ष्मण वाळके क्रांती पाटील अजित माने विजय सातपुते आणि मनोहर वाळिंबे यांनी केले आहे काव्य संमेलनासाठी हैदराबाद आणि सांगली पुणे सातारा लातूर अहमदनगर जळगाव अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी आपली प्रतिभा सादर करणार आहेत
एकूण 60 कवींना या काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती समाजोन्नती प्रतिष्ठानच्या समूह प्रशासक सौ संगीता माने आणि सौ क्रांती पाटील यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!