कराओकेमुळे नवीन गायक कलाकारांना व्यासपीठ
संगीतप्रेमी ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन
सातारा
गेल्या काही कालावधीमध्ये कराओकेच्या माध्यमातून गाण्यांचे कार्यक्रम सादर करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नवीन गायक कलाकारांना संधी उपलब्ध होते आणि व्यासपीठही मिळते असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी हॉलमध्ये गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली होती त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे संगीतविषयक कार्यक्रम सादर करणे काही प्रमाणात सोपे झाले आहे. पण त्यासाठी नवीन गायक कलाकारांना संधी मिळणेही आवश्यक असते. संगीतप्रेमी सारखे ग्रुप अशा कलाकारांना संधी उपलब्ध करून देतात असे मुकुंद फडके म्हणाले. तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन गायन कला सादर करतानासुद्धा काही किमान काळजी घ्यावी लागते असेही त्यांनी स्पष्ट केले
शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणामध्ये नवीन कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात असे स्पष्ट केले.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य राजेंद्र शेजवळ,विजय साबळे उपस्थित होते. त्यांनी संगीतप्रेमी ग्रुपला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील, विनय कुमार हे होते. या कार्यक्रमांमध्ये राहुल शेंडे, प्रदीप पवार, अजय घोरपडे, चेतन भडकमकर, स्नेहल चिंचणे, सुधा पटवर्धन, सुजाता नावंधर , तबरेज बागवान, मुन्ना चाचा, शरीफ सलाती ,मंगेश डावरे यांच्या शिवाय विनयकुमार, प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील यांनीसुद्धा गाणी सादर केली.कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

