केबीपी‌ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट,क्विक हील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार


“सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रमांतर्गत करार

Advertisement

सातारा,
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये, सातारा आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्यात “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत सामंजस्य करार (एमओयू) नुकताच संपन्न झाला.
या करारामुळे इन्स्टिट्यूट मध्ये सायबर वॉरियर्स क्लब स्थापन करण्यात आला असून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता, नेतृत्व विकास आणि सामाजिक जनजागृती याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित विद्यार्थी शाळा, महाविद्यालये तसेच समाजामध्ये सायबर फसवणूक, ऑनलाइन सुरक्षितता, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती करतील.
या उपक्रमासाठी इन्स्टिट्यूट मधील ओमकार कदम (प्रेसिडेंट), पूजा शिंदे (सेक्रेटरी), धनराज तपासे (मीडिया डायरेक्टर) आणि दिया सकुंडे (ॲक्टिव्हिटी डायरेक्टर) यांची क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी क्विक हील समन्वयक प्रा. मंथन जे. पंडित हे टीचर कॉर्डिनेटर म्हणून मार्गदर्शन करणार असून, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. डी. कुंभार तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची, नेतृत्व कौशल्ये विकसित करण्याची तसेच समाजामध्ये सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. इन्स्टिट्यूटच्या सामाजिक बांधिलकीला बळकटी देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचा विश्वास इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!