विजया मेहता यांचे निधन


मराठी रंगभूमी,समांतर सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड
मुंबई
मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरात निधन झाले.त्यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून, एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विजयाताई आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून ‘रंगायन’ चळवळीच्या अध्वर्यू होत्या. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणं ही त्यांची खासीयत होती. आधुनिक मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेमातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व असलेल्या विजया मेहता यांना नाट्यक्षेत्रात ‘बाई’ म्हणून आदरानं ओळखलं जायचं.
नाट्यक्षेत्रात ‘बाई’ म्हणून आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी 1960 च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासह ‘रंगायन’ या प्रायोगिक नाट्यचळवळीची स्थापना केली. या संस्थेनं प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली. या चळवळीमुळे मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी मांडणी आणि जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली.
‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘सुंदर मी होणार’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नाटकाचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी अनेक पिढ्यांतील कलाकार घडवले. तर, पार्टी सिनेमातली त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेलं पेस्तनजी आणि रावसाहेब हे सिनेमे विशेष मानले जातात. विजया मेहता यांनी ‘झिम्मा’ नावाचं आत्मचरित्र लिहिलंय. हे नुसतंच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे, असं प्रशंसकांचं म्हणणं आहे. विजया मेहता यांना नाट्यदर्पण पुरस्कार, पद्मश्री, महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार, त्यांनी लिहिलेल्या’झिम्मा’ सिनेमाला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार, रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कारही मिळालाय. तर, ‘झिम्मा’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, विष्णूदास भावे सुर्वणपदक, संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालाय.

Advertisement

विजया मेहता यांची गाजलेली नाटकं, सिनेमे आणि मालिका
अजब न्याय वर्तुळाचा
एक शून्य बाजीराव
एका घरात होती
कलियुग (सिनेमा)
क्वेस्ट (इंग्रजी सिनेमा)
जास्वंदी
पुरुष
पेस्तनजी (हिंदी सिनेमा)
बॅरिस्टर
मला उत्तर हवंय
मादी
रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी सिनेमा)
रावसाहेब (सिनेमा)
लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी सिनेमा)
वाडा चिरेबंदी
शाकुंतलम (चित्रवाणी सिनेमा)
श्रीमंत
स्मृतिचित्रे (टेलिव्हिजन मालिका)
हयवदन
हमिदाबाईची कोठी (नाटक आणि टेलिव्हिजन मालिका)
हवेली बुलंद थी (हिंदी सिनेमा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!