साताऱ्यात गुरुवारी गझल गायन कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सुरीली श्याम यांच्यातर्फे आयोजन
Advertisement
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरीली श्याम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात गझल पुनम धुमाळ आणि कैलास मोहिते हे सादर करणार आहे. तसेच कार्यक्रमाचे निवेदन सविता जाधव करणार आहेत. या कार्यक्रमास सध्या चौगुले, ममता नरहरी, मुकुंद फडके, लियाकत शेख, शिरीष चिटणीस, विनायक भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सर्व सातारकरांनी या गझल कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

