साताऱ्यात रविवारी याद किया दिलने गाण्यांचा कार्यक्रम
आशा भोसले व अनिल वाळिंबे यांना आदरांजली
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व यादे सिने संगीत क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी हॉल येथे याद किया दिलने हा गाण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक अनिल वाळिंबे यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, मुकुंद फडके, राजेंद्र शेजवळ ,सौ सुरेखा शेजवळ, आशुतोष वाळिंबे, रेश्मा वाळिंबे, विनायक भोसले उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुकुंद पांडे ,महेश बुटे ,अरुण कुलकर्णी, विजया चव्हाण आरती वाणी हे गायक कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्था व यादे सिने संगीत क्लब यांच्यातर्फे करण्यात आली आहे

