लेखकानी वास्तवाचे भान ठेऊन कसदार लेखन करावे: डॉ संदीप सांगळे
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय अक्षर गौरव साहित्य पुरस्काराचे वितरण
सातारा
समाजातील वास्तवतेची जाण ठेवून साहित्यिकांनी सत्य आणि कसदार लेखन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी केले.
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा यांचे मार्फत कै भास्करराव माने स्मृत्यर्थ अक्षर गौरव साहित्य पुरस्काराचे वितरण डॉक्टर संदीप सांगळे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रसिद्ध मालिका लेखक विशाल कदम उपस्थित होते.
साहित्यिकांनी आजूबाजूच्या परिस्थितीकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असते. समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टीचे प्रतिबिंब साहित्यिकाच्या साहित्यकृती मधून पडत असते. ज्या साहित्यकृतीत वास्तवाचा अंश असतो तीच साहित्यकृती काळाच्या कसोटीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत असते साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून साहित्यिकांनी संवेदनशील दृष्टिकोनातून आपली लेखणी सिद्ध करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
समाजासोबत राहत असताना साहित्यिक सर्वांगीण अनुभव घेत असतो. याच अनुभव विश्वाची समृद्धी हे साहित्य निर्मितीला पूरक आणि पोषक असते पुरस्कार हे प्रेरणा देत असतात. त्यामुळे साहित्यिक कलावंतांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने समाजवास्तव मांडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन संदीप सांगळे यांनी केले
अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी विशाल कदम यांनी हे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार लेखकांना प्रेरणा देत त्यांच्याकडून नवीन लेखन होण्यासाठी ऊर्जा देतील असे प्रतिपादन केले
यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भारती व ग्रंथालयाचे अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने कार्यवाह शशी भूषण जाधव उपाध्यक्ष दत्तात्रय मोहिते मंचावर उपस्थित होते.
आशा नेगी व डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार तर संजीवनी तोफखाने कांचन सावंत विश्वास वसेकर सचिन पाटील धनाजी घोरपडे,राजश्री शहा यांना विशेष अक्षर गौरव पुरस्कार आणि राजीव मुळे सुनील शेडगे शुभदा कुलकर्णी श्रीकांत कात्रे संगीता केंजळे विश्वजीत जाधव राजेंद्र घाडगे यांना सातारा जिल्ह्यातील लेखकाकरता देण्यात येणारे अक्षर गौरव प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आरोग्य विषयक पुस्तकासाठी देण्यात येणारा डॉक्टर श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ अक्षर गौरव पुरस्कार डॉक्टर मोहन सुखटणकर यांना प्रदान करण्यात आला .
प्रास्ताविक करताना डॉक्टर रवींद्र भारती यांनी अश्वमेध ग्रंथालय हे सातत्याने वाचन संस्कृतीला बळ देणारे कार्यक्रम करत असते असे सांगून भविष्यात ही सातारा जिल्ह्यातील लेखकांसाठी एक दिवशीय साहित्य संमेलन आयोजित करणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर राजेंद्र माने यांनी पुरस्कारा मागची भूमिका मांडताना लेखकांना ऊर्जा मिळून सातत्याने वास्तवाचे भान ठेवून लेखक लिहिते राहावेत म्हणून या पुरस्कारांचे प्रयोजन आहे असे सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.
श्रीधर साळुंखे यांनी आभार मानले.
यावेळी सीमा नूलकर ,बाबुराव शिंदे , वर्षा देशपांडे, संध्या चौगुले कांता भोसले प्रदीप कांबळे, शैला जाधव , प्रा संजीव बोंडे, डॉ आदिती काळमेख ,डॉ बाबा सुखटणकर, निलेश महिगावकर ,अंकुश केंजळे , अश्विनी कोठावळे , सविता कारंजकर , युवराज खरात , रोहिणी माने, सुनिता माने, कविता प्रभुणे , स्वप्नील शिंदे , गौतम भोसले आनंदा ननावरे वासंती घाडगे , आर डी पाटील , निलेश पवार डॉ श्याम बडवे जयंत देशपांडे वगैरे मान्यवर उपस्थित होते

