आज साताऱ्यात सुरेल गाण्यांची मैफल
दीपलक्ष्मी पतसंस्था,संगीतप्रेमीतर्फे आयोजन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दीप लक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये गाण्यांची सुरेख सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील व विनयकुमार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काका पाटील,मुकुंद फडके, डॉक्टर कामिनी पाटील, प्राचार्य राजेंद्र शेजवळ, मनोज तपासे, राजेंद्र हेंद्रे,शिरीष चिटणीस, प्रमोद लोंढे उपस्थित राहणार आहेत. या संगीत कार्यक्रमात तरनुम सय्यद,सुजाता नावंधर,सुधा पटवर्धन,अस्मिता होके,प्रदीप पवार,विलास चव्हाण, माणिक कांबळे,संजय खराटे, किशोर होके,सलीम चाचा, संदेश जावळे, कदीर सय्यद,डॉक्टर बारटक्के,शरीफ सलाती आणि इतर गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत.सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

