बुधवारी हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुकूनतर्फे आयोजन
सातारा:
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व अमरेंद्र रविंद्र मोटे सर द्वारा “सुकून” यांच्या संयुक्त विद्यमाने सुमधुर नव्या जुन्या हिंदी मराठी कराओके गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आपली आवड: भाग 4 बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी रोजी सायंकाळी 5.30 वा. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, दीपलक्ष्मी नागरी सह. पतसंस्था चेअरमन,शिरीष चिटणीस, सुरेखा शेजवळ व डॉ. कामिनी पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायक कलाकार विनायक लोहार, जुबेर शेख, आझाद आतार, सुनिल राठी, सुनिल मसुरकर, मुकतार आतार, सुधा पटवर्धन, वैशाली केसकर, संगीता वाघमारे आणि रविंद्र मोटे सर विविध हिंदी व मराठी गीते सादर करणार आहेत. सर्वांनी या विनामुल्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

