रंग लोकसंस्कृतीचे वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन


चित्रकार विजयकुमार धुमाळ यांचे प्रात्यक्षिक ठरले विशेष आकर्षण.

Advertisement

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा व संस्कृती कला अकादमी सातारा यांच्यावतीने आयोजित रंग लोकसंस्कृतीचे या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.कला प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या शास्त्रीय नृत्य गुरु वैशाली पारसनीस यांच्या हस्ते आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, लोकमत संपादक हनुमंत पाटील सर आणि जीईएस कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ तसेच विनायक भोसले व्यवस्थापक दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या उपस्थितीत झाले.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास व्हावा , लोकसंस्कृतीतील रुढी ,परंपरा , मान्यता याविषयी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चित्रे रेखाटली असून सदर प्रदर्शनातून समाजात देखील आपल्या लोकसंस्कृतीचा प्रसार व्हावा या दृष्टीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे असे प्रास्ताविकामध्ये संस्कृती कला अकादमीचे प्रमुख प्रसाद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सातारा शहर व परिसरातील कला विद्यार्थ्यांनी दीपलक्ष्मी पतसंस्था येथे वरचेवर कलाप्रदर्शनी भरवून कलाकृतींची विक्री करावी व त्यातून प्रोत्साहन निर्माण करावे असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी कला विद्यार्थ्यांना आवाहन केले. हनुमंत पाटील यांनी बोलताना काही कलाकृतींचा विशेष उल्लेख त्यामध्ये केला. संस्कृती जपणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी ओळखून तुम्ही जो तिचा अभ्यास केला आहे त्यामुळे नक्कीच संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होईल असे त्यांनी मत व्यक्त केले.
प्राचार्य विजयकुमार धुमाळ व दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वैशाली पारसनीस यांनी नृत्य आणि चित्र यातील विशेष संबंध यावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्वच कलाकृतींचे विशेष कौतुक केले
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सिद्धी जगताप आणि श्रेया मेळाट यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रकटन संस्कृती कला अकादमीचे प्रसाद चव्हाण यांनी केले.
उद्घाटनानंतर लगेचच प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांचे चित्र प्रात्यक्षिक झाले दरम्यान विद्यार्थ्यांशी हितगुज साधन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करीत रंगरेषांचे फटकारे देत धुमाळ सर यांनी सुंदर कलाकृती सादर केली. यावेळी विद्यार्थी पालक चित्रकार व विविध मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रदर्शन दिनांक 18 तारखेपर्यंत सर्व सातारकर रसिकांना पाहण्यास खुली आहे दरम्यान विविध कार्यक्रम, मुलाखती यांची मेजवानी असणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा . असे आवाहन संस्कृती कला अकादमीच्या वतीने व्यवस्थापक एकांक नलवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!