केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा वार्षिक बक्षिस वितरण समारंभ


मंगळवारी गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा होणार गौरव
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे मंगळवार दिनांक ३१ मार्च रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हास्तरावर विद्यापीठ स्तरावर व राज्यस्तरावर अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवलेले विद्यार्थी व शिक्षकांना तसेच विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व संशोधन क्षेत्रात दैदीप्यमान काम करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा वार्षिक बक्षीस समारंभामध्ये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. अंतीम वर्षामधील विद्यार्थी कंपन्यांनी आयोजीत कॅम्पस मुलाखतीद्वारे नोकरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे . विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवर संशोधनामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर बी एस सावंत यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!