योग्य संकल्प करून ध्येयपूर्ती गाठा
ज्योतिष मंडळाच्या कार्यक्रमामध्ये अतुल शास्त्री भगरे यांचा कानमंत्र
सातारा
नवीन 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबाबत सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असणारच आहे. पण सर्वांनीच या नवीन वर्षाच्या निमित्ताने एखादा योग्य संकल्प करून या संकल्पाच्या माध्यमातूनच आपली ध्येयपूर्ती गाठावी असा कानमंत्र ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे यांनी दिला
ज्योतिषमंडळ सातारा यांच्यामार्फत अतुल शास्त्री भगरे यांचे विशेष व्याख्यान येथील समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी भगरे गुरुजी बोलत होते
व्यासपीठावर श्री रमणलाल शहा,ऍड श्रीराम देव ,नंदकुमार जोशी श्री वेलणकर श्री चिपलकट्टी महेश कुलकर्णी,श्री कोष्टी उपस्थित होते
प्रत्येक व्यक्तीने कर्म,कर्तव्य,कर्तृत्व आणि कृतार्थपणा या चार गोष्टी लक्षात ठेवून जीवन व्यतीत करायला हवे संपत्ती मिळवणे म्हणजेच सर्व काही आहे असे नाही तर माणूस म्हणून आपण कसे वागतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे असे सुद्धा यावेळी भगरे गुरुजी यांनी सांगितले

भगरे गुरुजी यांनी यावेळी उपस्थित सातारकर नागरिकांना उपासनेबाबत मार्गदर्शन केले प्रत्येक राशीसाठी योग्य उपासना कोणती याबाबत त्यांनी काही सूचना केल्या उपास करण्याचा आग्रह न धरता उपासनेकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
यावेळी बोलताना प्राचार्य रमणलाल शहा यांनी शनिच्या साडेसातीबाबत मार्गदर्शन केले साडेसातीला न घाबरता सामोरे जावे आणि या कालावधीमध्ये कमी बोलून काळजीपूर्वक व्यवहार करावा असे आवाहनही त्यांनी केले
यावेळी ज्योतिष मंडळाच्या काही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कुलकर्णी यांनी केले
आभार ऍड श्रीराम देव यांनी मानले
सूत्र संचालन स्वप्ना पवार यांनी केले
कार्यक्रमाला सातारकर नागरिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

