मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त साताऱ्यात १ मार्चला कार्यशाळा
सातारा नगरपालिका, मसाप शाहूपुरी शाखेचा संयुक्त उपक्रम
सातारा
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त सातारा नगरपालिका आणि मसाप, पुणे शाहूपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्ममाने रविवार दि.१ मार्च रोजी कादंबरीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे मार्गदर्शन ‘ पिपीलिका मुक्तिधाम ‘ ‘चिंबोरे युद्ध ‘यासारख्या दर्जेदार कादंबऱ्यांचे प्रसिध्द लेखक डॉ. बाळासाहेब लबडे हे करणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे.यासाठी कोणतेही शुल्क नाही. ही कार्यशाळा रविवार दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे.
या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या सर्वाना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . त्यासाठी प्रवेश मर्यादित आहेत. तरी ज्यांना या कार्यशाळेसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी २५ फेब्रु चे आत सचिन सावंत मोबाईल नं. ९८६०५२२७०६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मसाप, पुणे शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे

