गुणवंत कामगार प्रतिष्ठानचा गौरव
प्रतिष्ठानच्या तीन कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार
सातारा
संस्कार भरती जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 29 वर्षांपूर्वी साताऱ्यात कामगारांसाठी स्थापन केलेल्या,”गुणवन्त कामगार प्रतिष्ठानच्या सर्वश्री प्रवीण जाधव गोदरेज अँड बॉईज ली शिरवळ,राजकुमार किर्दत अल्फा लावल सातारा व विकास धुमाळ महाराष्ट्र स्कुटर्स ली सातारा या कामगारांना महाराष्ट्र शासनाचे,” विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार 2023 काल जाहीर झाले आहेत,ह्या पुरस्कारात 25 हजार रुपये रोख,सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह व पतीपत्नीस मुंबईस जाण्या येण्याचा फर्स्ट क्लासचा खर्च प्रदान केला जातो. विशेष म्हणजे सर्व महाराष्ट्रात फक्त 51 कामगारांनाच हे पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये प्रतिष्ठानच्या 3 कामगारांनी हा बहुमान पटकवलेला आहे या यशाबद्दक गुणवन्त कामगार प्रतिष्ठान साताराचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे
दरवर्षी गुणवन्त कामगार प्रतिष्ठानच्या कमीत कमी 3,4 कामगारांस शासनाचे हे पुरस्कार प्राप्त होतात असे दिलीप चरेगावकर यांनी सांगितले दिलीप चरेगावकर रघुवीर आपटे व गोपाळ खजुरे प्रतिष्ठांनचे संस्थापक असून या तिघांना शासनाचे गुणवन्त कामगार पुरस्कार प्राप्त झाले आहेत
राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले.कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ एका कामगाराची निवड केली जाते. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी राज्यभरातून ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नोकरी करत असतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे येत्या १३ मे रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.