साताऱ्यात शुक्रवारी सुरमयी शाम


सातारा
स्वरमांगल्य या संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी शाहू कला मंदिरात सुमधुर हिंदी मराठी गाण्यांची मैफिल सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व गीते इलेक्ट्रॉनिक वाद्यांशिवाय सादर केली जाणार आहेत. रसिकांपर्यंत गाण्यातील शब्द नीट पोचविण्यासाठी व्हायोलिन, संवादिनी, बासरी आणि अकॉस्टिक गिटार या मूळ सुरवाद्यांच्या साथीने गाणी सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रकांत शिंदे यांची असून त्यांच्यासह संतोष वाघ, डॉ. सुनिल पटवर्धन, पियुषा भोसले, अनुराधा पंडितराव, विभावरी गोडबोले हे गायक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या गीतांना स्वरा किरपेकर (संवादिनी), शशी भोसले आणि दीपाली (गिटार), कैवल्य दळवी (बासरी), आशुतोष वाळिंबे (ताल वाद्ये), मिलिंद देवरे (तबला), बाळकृष्ण म्हसवेकर (ढोलक) आणि केदार गुळवणी (व्हायोलिन आणि सतार) हे कलाकार साथसंगत करणार असून संगीत संयोजन राजेंद्र आफळे यांचे आहे. सविता कारंजकर निवेदन करणार आहेत तर ध्वनी व्यवस्था ही सुभाष कुंभार यांची आहे. कार्यक्रमास विशेष उपस्थिती ही नगराध्यक्ष अमोल मोहिते, धनंजय जांभळे, अमित कुलकर्णी यांची आहे तरी सर्व संगीत रसिकांनी मैफिलीचा लाभ घ्यावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!