स्वानंद,ऋग्वेद यांना दुहेरीचे विजेतेपद
सातारा,
डेक्कन जिमखाना ,पुणे येथे पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत स्कूलिंपिक टेबल टेनिस स्पर्धेत स्वानंद जोगळेकर आणि ऋग्वेद दांडेकर या जोडीने बारा वर्षाखालील गटात दुहेरीचे विजेतेपद मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली.अंतिम सामन्यात या जोडीने अटीतटीच्या लढतीत लक्षित गांगल आणि शशांक शास्त्री या जोडीचा 7/11,11/9,7/11,11/7,13/11 असा पराभव केला.त्याआधी एकेरी गटात ऋग्वेदने अंतिम लढतीत निकराची झुंज दिली.मात्र त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर स्वानंदने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा शिक्षक प्रफुल्ल सर,नचिकेत सर,राष्ट्रीय खेळाडू सौ.दांडेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.स्वानंद हा ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांचा नातू आहे.

