शनिवारी साताऱ्यात सदाबहार नगमे कार्यक्रम
सातारा
Advertisement
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सुरसंगम सदाबहार नगमे हा गाण्यांचा कार्यक्रम शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक शहाबुद्दीनभाई शेख असून संगीत व मार्गदर्शन युनूसभाई शेख यांचे लाभले आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू गुजर, प्रज्ञा शिंदे, सुरेखा शेजवळ,मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वाती शेडगे, जस्मिन शेख, प्राध्यापक राजेंद्रकुमार निकम, अरुणा नाझरे,सुभाष पाटोळे, अनिल राठी,प्रदीप ढमाळ,अमोल जाधव, विनोद भिसे,यशेंद्र क्षीरसागर हे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

