सुनहरे नगमे कार्यक्रमाला प्रतिसाद


सातारा
दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि यादे सिने संगीत क्लब सातारा आयोजित सुनहरे नगमे कार्यक्रमात मुकेश आणि रफी यांची सुंदर गाणी सादर झाली
मुकेश यांचा आवाज दर्द भरा तर रफीजींचा आवाज मनाला मोहून टाकणारा. यांची गाणी ऐकताना आपणही संगीतात हरवून जातो. असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या सुरेखा शेजवळ यांनी केले.त्या म्हणाल्या, दीपलक्ष्मी पतसंस्था वेगवेगळ्या व्यक्तींची व्याख्यान,अनेक पुस्तकांचे प्रकाशन, संगीताचे कार्यक्रम या सर्वातून मानवी मनाची मशागत करत असते.साताऱ्यातील व्यक्ती उत्तम नागरिक झाली पाहिजे यासाठी या पतसंस्थेमार्फत सतत प्रयत्न चालू असतो.नवोदित कलाकारांना येथे वाव मिळतो त्यामुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम दीप लक्ष्मी पतसंस्था या ठिकाणी करत आहे.
या कार्यक्रमासाठी ममता नरहरी,इक्बाल शेख,मोहन पुरोहित,शिरीष चिटणीस,मुकुंद पांडे,विजय साबळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मुकुंद पांडे,विजय साबळे,अरुण कुलकर्णी,महेश बुटे,विजया चव्हाण,ज्योती साळुंखे आणि आरती वाणी यांनी विविध गाणी ऐकवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
सुरेखा शेजवळ यांनाही एक गाणे सादर केले.
स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
ध्वनिव्यवस्था सचिन शेवडे यांची होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!